अद्यावत तक्रार व्यवस्थापन प्रणाली व PMC Officer Connect मोबाईल ॲपची अंमलबजावणी करणेबाबत सूचना


तक्रार व्यवस्थापन प्रणाली Reception User यांचेसाठी सूचना

१) अद्यावत तक्रार व्यवस्थापन प्रणालीची लिंक पूर्वीच्या प्रणालीप्रमानेच म्हणजेच (http://complaint.punecorporation.org/) अशी असणार आहे.
२) अद्यावत तक्रार व्यवस्थापन प्रणालीची प्रत्यक्ष अंमलबजावणी दि. ०१/०३/२०२० पासून सुरु करण्यात येणार आहे. तत्पूर्वी आपले विभागांच्या सर्व Laddar मध्ये संबंधित अधिकारी यांना Assign करणे आवश्यक आहे.
३) या प्रणालीमध्ये तक्रार प्रथम क्षेत्रिय कार्यालय / मुख्य खात्याकडील Reception User यांचेकडे प्राप्त होणार आहे व तद्नंतर त्यांनी ती तक्रार संबंधित L1 User (अधिकारी) यांना Assign करावी.
४) L1 User (अधिकारी) यांना तक्रार Assign झाल्यानंतर सदर तक्रार वेळेत निरस्त न झाल्यास ती तक्रार त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांना Auto Escalate होईल.
५) Reception User यांनी त्यांचेकडे प्राप्त झालेली तक्रार आपल्या क्षेत्रिय कार्यालय / मुख्य खात्याशी संबंधित नसल्यास Reception User यांनी सदर तक्रार Forward करून संबंधित खात्यास पाठवावी.
६) Reception User यांचेकडे प्राप्त झालेली तक्रार एकापेक्षा जास्त अधिकारी / विभागांशी संबंधित असल्यास सदर तक्रार Reception User यांना ती split करून एकापेक्षा जास्त अधिकारी / विभाग यांना पाठवता येईल.
७) Reception User यांनी आपल्या खात्याकडील अधिकारी सेवकांना त्यांचेकडे प्राप्त झालेल्या तक्रारी निरस्त करणेसाठी “PMC officer Connect” मोबाईल ॲप वापरणेबाबत प्रशिक्षण द्यावे.
८) ज्या Reception User यांना अद्यावत तक्रार व्यवस्थापन प्रणाली व मोबाईल ॲप वापराबाबत अथवा Laddar मध्ये अधिकारी Assign करणेबाबत काही शंका / अडचण असल्यास ६६१५ / ६६१७ / ६६१८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

अधिकारी / सेवकांसाठी सूचना (मोबाईल ॲप संबंधी )

९) नव्याने विकसित केलेले “PMC officer Connect” हे मोबाईल ॲप सर्व सेवकांसाठी असून या मोबाईल ॲपमध्ये सेवकांशी संबंधित बहुतांश गोष्टी अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. उदा. मनपा सेवकांसाठी तक्रार प्रणाली, फाईल ट्रॅकिंग प्रणाली, सेवकांची वैयक्तिक वेतनबिल संबंधीत माहिती व पगारपावती, मनपा परिपत्रके, अधिकारी / सेवक संपर्क क्रमांक, मनपा कॅलेंडर, सुट्ट्या, डायरी, स्वच्छ सर्वेक्षण फॉर्म, शासननिर्णय शोध इत्यादी. गोष्टींचा समावेश केला आहे.
१०) या मोबाईल ॲपमधील सर्व Module मध्ये सर्व सेवकांना खुला Access ठेवला आहे. फक्त तक्रार प्रणाली, फाईल ट्रॅकिंग प्रणाली, स्वच्छ सर्वेक्षण या तीन Module मध्ये फक्त संबंधित सेवकांना प्रवेश करता येईल.
११) सदर मोबाईल ॲप Android Platform वर विकसित करण्यात आले आहे. मोबाईल ॲप डाऊनलोड करणेसाठी Play Store मध्ये जाऊन डाऊनलोड करावे.
१२) ज्या अधिकारी / सेवकांकडे यापूर्वीच “PMC officer Connect” मोबाईल ॲप Install केले असेल त्यांनी ते ॲप डिलीट (uninstall) करून नविन ॲप डाऊनलोड करून Install करावे.
१३) मोबाईल ॲपचा युजर आयडी व पासवर्ड पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आलेला आहे. ज्या सेवकांकडे मोबाईल ॲपचा युजर आयडी व पासवर्ड नसेल त्या सेवकांना युजर आयडी व पासवर्ड मोबाईलवर SMS द्वारे पाठविण्यात येईल.
१४) मोबाईल ॲप Install करून झाल्यानंतर लॉगीन करताना पहिल्यांदा फक्त एकदाच आपल्या मोबाईलवर One Time Password (OTP) चा संदेश येईल तो OTP टाकल्यानंतर User Authenticate होईल.
१५) मोबाईल ॲप वापराबाबत काही शंका / अडचण असल्यास ६६१५ / ६६१७ / ६६१८ या क्रमांकावर संपर्क साधावा.